translation

वर्ल्ड बुक फेअर 2018


कोण्या व्यक्तीने ही अगदी सुंदर ओळ सांगितली आहे: लोकांना उभारा आणि लोक व्यवसाय उभारतील. त्या व्यक्तीने आणि आपण सगळ्यांनी प्राण्यापासून उत्क्रांती करत एका अविश्वसनीय जीवात रुपांतरण केले आहे जे मुख्यत्वे दोन गोष्टींमुळे शक्य झाले, एक म्हणजे मेंदु आणि दुसरा म्हणजे समाज उभारण्याची क्षमता. एकमेकांशी नातेसंबंध जोडण्याचे समाज एक शक्तिमान आयुध आहे.   

नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील वर्ल्ड बुक फेअर असेच प्रभावशाली स्थळ बनले आहे, जिथे एकसारखे विचार असलेल्या लोकांचा समाज मूळ धरत आहे. असे लोक जे भाषा, वाड:मय, कल्पनातीत जगताशी निगडीत आहेत, सृजनशील आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करणारे  आहेत. बुधवार 10 जानेवारी आम्हाला काही लोकांशी भागीदारी करण्याची संधी देऊन गेला. एकाबाजूला कामाच्या संदर्भात विचारणा येत होत्या, तर दुसऱ्याबाजूला कामासाठी विचारणा करणारे लोक आमच्या सोबत काम करण्यासाठी रजिस्टर होत होते. सगळे अगदी आमच्या इच्छेप्रमाणे घडले.   

चला आम्ही तुम्हाला आमच्या सेवांची संक्षेपात माहिती देतो! आम्ही नानाविध मीडिया सेवा एकाच ठिकाणी पुरवणाऱ्या आगळ्यावेगळ्या कंपन्यांपैकी एक आहोत. लेखन, भाषांतर, ट्रान्स-क्रिएशन, ट्रान्स्क्रिप्शन, सबटायटलिंग, इंटरप्रिटेशन, व्हॉइसओव्हर, टाइपसेटिंग, प्रुफरिडिंग, ग्राफिक डिझाइनिंग एंटरप्राइज तंत्रज्ञान समाधाने, स्टेज प्रोडक्शन, ऑडिओ विज्युअल आणि इत्यादी सेवा, एकत्रितपणे? आम्ही कधी कधी म्हणतो की, आम्ही मीडिया सेवांच्या रामोजी फिल्म सिटीत आहोत. आमचे क्लाएंट्स आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यकता, गरजा, टप्पे घेऊन येतात आणि त्या सर्व घटकांना आम्ही एकाचवेळी पूर्ण करतो.   

याचा नक्की विचार करा: तुमच्याकडे एक पुस्तक आहे आणि त्याचे तुम्हाला एखाद्या भाषेत भाषांतर करायचे आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला भाषांतरकार लागेल, मग टाइपसेटर, प्रुफरीडर, ग्राफिक डिझाइनर आणि तुम्हाला कितपत पुढे जायचे यावर अवलंबून इतर आणखीनही कौशल्ये लागतील. लोकांशी, एजन्सीज किंवा स्थळांशी समन्वय न साधता मांगरोल मल्टिमीडियामध्ये या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण केल्या जातात.

डब्ल्यूबीएफ 2018च्या विषयाकडे पुन्हा वळत, आमचा स्टॉल अनेक कौशल्यांना आकर्षित करतो आहे. जवळपास सर्व हॉल्समधल्या स्टॉल्सचे लोक आमच्या जगताला चोखाळण्यासाठी आमच्या स्टॉलला भेट देत आहेत. “अरे व्वा! 40हून जास्त भाषा आणि एवढ्या सेवा? तुम्ही अगदी आगळीवेगळी कंपनी आहात.” होय! आम्ही आहोतच मुळी सर्वांहून वेगळे कारण आम्ही अनेक घटक एकत्रितपणे ऑफर करु शकतो कारण आम्ही दर्जा आणि वेळेची मर्यादा या दोन्हींचा उत्तमप्रकारे मिलाफ साधतो.    

 आज आम्हाला भाषांतर, पुस्तके व मासिकांसाठी, मोठ्या तत्वावरील टाइपसेटिंग कामांसाठी, स्टार्ट-अप आरंभाच्या प्रकल्प अहवालांसाठी, राजकीय नेत्यासाठी भाषण लिहिण्याच्या, एका जलद गतीने प्रगती करणाऱ्या प्रकाशन संस्थेसाठी सोशल मीडिया व्यवस्थापनाशी निगडीत, इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅंडच्या टेलिव्हिजन जाहिरातीच्या निर्मितीची, फर्टिलायजर कंपनीच्या स्ट्रीट प्ले अभियानासाठी, इमेज एनहान्समेंट.... आणि अशा अगणित प्रकारच्या विचारणा करण्यात आल्या. आजचा सर्वोत्तम प्रतिसाद भविष्यातील उत्तम, सक्रिय दिवसांची जणूकाही ग्वाही देत होता.   

या! तुम्ही सुद्धा प्रगती मैदानात आयोजित केलेल्या डब्ल्यूबीएफ 2018मधल्या आमच्या मांग्रोल मल्टिमीडिया स्टॉलला रविवार 14 जानेवारी 2018च्या आत भेट द्या. जर तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीडिया जगताशी निगडीत असाल; तुम्ही लेखक, भाषांतरकार, प्रकाशक, इंटरप्रिटर, व्हिज्युअलाइजर, वेब डेव्हलपर, कथाकार, स्क्रीनरायटर, नाटक लेखक, सिनेमॅटोग्राफर, संपादक, प्रुफरिडर असाल किंवा इतर कोणीही असाल तरी आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या. आपल्या दोघांच्या सहयोगासाठी आणि पुढे अनेक अदभूत गोष्टी साकारण्यात तुमची आम्हाला नक्कीच मदत होईल.   

वर्ल्ड बुक फेअर 2018मध्ये मांगरोल मल्टिमीडिया : हॉल क्र.12, स्टॉल क्र. 151

कोणत्याही मदतीसाठी कृपया या क्रमांकावर संपर्क करा : 9653416394.

Comments