translation

वर्ल्ड बुक फेअर पुढची भेट 2019 मध्ये


वर्ल्ड बुक फेअर पुढची भेट 2019मध्ये

रविवार म्हणजे नवी दिल्लीच्या जगविख्यात बुक फेअरच्या समापनाचा सर्वात चांगला दिवस होता. आम्हाला अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी इथेच हा कार्यक्रम पुन्हा एकदा आणखीन प्रगल्भतेने आणि विशेषतांनी पार पडेल!

एनबीटी बुक फेअर 2018 ब्लॉग: दिवस 09 रविवार 14 जानेवारी 2018
लेखक संजय वि शहा

संपूर्ण भारतात लोहरी, मकर संक्रांत आणि पोंगल आज साजरा केला जात असताना नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये पुस्तक आणि वाड:मय प्रेमी पुस्तकांसोबत राहण्याच्या त्यांच्या असीम उत्साहाला साजरा करत आहेत. फेअरचा अखेरचा दिवस अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम होता.

प्रगती मैदान मेट्रो स्टेशन गेट नावाने ओळखल्या जाणाऱ्या गेट क्र. ८ने मैदानामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला लांब लांब रांग..... चुकलोच! रांगा पहायला मिळाल्या. आत जाताच सर्वत्र भेट देणाऱ्या व्यक्तींची वर्दळ जाणवली, आज भरपूर लोक आले होते, कदाचित ते आठ दिवसांच्या लोकांएवढे होते असं म्हणायला हरकत नाही!

लेखक, भाषांतरकार, प्रकाशक आणि इतर बरेच लोकांना मांगरोल मल्टिमीडियाबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्यायची होती. वर्तमान पत्रातील जाहिरात वाचूक आलेल्या अनेक लोकांशी आम्ही बोललो त्यांना आमच्यासोबत काम करण्याची संपूर्ण माहिती देऊन त्यांचे समाधान केले.

आमच्या सारख्या स्टॉल होल्डर्सकडून आम्हाला भेटी मिळाल्या आठवण म्हणून आमचे फोटो घेतले गेले, एनबीटीचे आम्हाला 2018 चे सुंदर कॅलेंडरसुध्दा मिळाले. त्यांच्या मासिकाचा दर्जा आणि माहिती आवडल्यामुळे आम्ही ते सबस्क्राइब देखील केले, काही स्टॉल्समधून आम्ही पुस्तके घेतली, एकूण आमचा दिवस उत्तम होता.

नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाद्वारे आयोजित नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअर केवळ भारतातलेच नव्हे तर संपूर्ण जगामधले आपल्या तऱ्हेचे एकमेवाद्वितीय प्रदर्शन आहे. आम्हाला आणखीन परिश्रमांनी ते अधिक चांगले आणि भव्य होऊ शकते असे प्रांजळपणे वाटते.

दिवसाचे समापन करण्याआधी आम्हाला काही गोष्टी शिकायला सुध्दा मिळाल्या. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रगती मैदानातल्या बांधकामामुळे पुढच्या वर्षी याचे आयोजन ग्रेटर नॉइडात केले जाणार आहे, तर काही लोक बांधकाम पुढच्या वर्षी पूर्ण होणार असल्याचे आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स अशा मैदानाच्या परिसरात असलेल्या सुविधा आम्हाला पुढच्यावर्षी मिळणार असल्याचे सांगत आहेत.

चला, तर सर्वांनी अपेक्षा करुया की पुढच्या वर्षी फेअरचे स्थळ हेच राहिल, आणि विकासात्मक कामांमुळे फेअरची प्रतिमा आणखीन सुधारेल!

नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअरमध्ये पुन्हा भेटूया!

(संजय वि शहा मांगरोल मल्टिमीडियाचे संस्थापक-सीइओ आहेत)

Comments