translation

भाषांतरात घडणाऱ्या अभूतपूर्व गोष्टी


परिचय: वाढती प्रसारण माध्यमे आणि लोकांच्या त्यांना माहिती असलेल्या भाषेत लिखाण करण्याच्या महत्वाकांक्षेसोबत भाषांतर क्षेत्राने उभारी घेतली आहे.  

एनबीटी वर्ल्ड बुक फेअर 2018 ब्लॉग: दिवस 04 – मंगळवार 09 जानेवारी 2018

लेखक: संजय वि. शहा

वर्ल्ड बुक फेअर 2018 मधल्या अनेक स्टॉल्सना भेट देताना आणि  आम्हाला भेट देणाऱ्या लोकांसोबत बोलताना, नॅशनल बुक ट्रस्टद्वारे आयोजन केलेल्या या कार्यक्रमात आम्हाला अनेक गोष्टी अवगत झाल्या.  काही गोष्टी अपेक्षित होत्या तर काही अगदी अनपेक्षित! प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजन केलेल्या या कार्यक्रमाला हजारो लोक येतात. ते आपली मतं, विषयाचे त्यांनी केलेले आकलन आम्हाला सांगतात, त्यांना भेटल्यामुळे जगाला जणू काही एका वेगळ्या विचारसरणीने पाहण्यामध्ये आम्हाला मदत मिळते आहे.    

हॉल 12 मधला आमचा स्टॉल क्र. 151 एका उत्तम प्रकारे नियोजन केलेल्या आणि आकारात तुलनेने थोड्याश्या मोठ्या इस्लामिक संस्थेच्या स्टॉलसमोर आहे, ऍमेझॉन कंपनीचा स्टॉल आमच्या अगदी शेजारीच आहे. आमच्या उजवी आणि डावीकडे नवी दिल्लीमधले अनेक प्रसिध्द प्रकाशक, धार्मिक गट, मराठी प्रकाशकांचा स्टॉल असे अनेक स्टॉल्स आहेत. दुस-या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास डब्ल्यूबीएफ 2018मध्ये लहानश्या भारतात स्थानापन्न होण्याच्या भावनेने आम्ही इथल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत.   

आज आमच्या स्टॉलवरची वर्दळ वाढली होती. उत्सुकतेने पाहणाऱ्यांपासून ते ट्रान्सलेटर्स, डिझाइनर्स, इंटरप्रिटर्स तसेच इतर स्टॉल्सच्या प्रतिनिधिंच्या घोळक्यात आजचा दिवस पार पडला. आम्हाला इतर स्टॉल्सकडून भाषांतर आणि वेब डिझाइन्सबद्दल विचारणा सुध्दा करण्यात आली. या विचारणांमधून व्यावसायिक नातेसंबंध देखील जुळतील अशी अपेक्षा खुणावते आहे!

ट्रान्सलेटर्ससाठी आम्ही काही वर्तमान पत्रांमध्ये जाहिराती देखील दिल्या होत्या. सकाळपासून त्यांचे कॉल्स आणि दुपारपासून त्यांच्या आमच्या स्टॉल्सवर भेटींची सुरुवात झाली. भारतीय ट्रान्सलेटर्सकडून दिल्या जाणाऱ्या भाषांच्या जोड्यांनी आम्ही अक्षरश: अवाक झालो. एक ट्रान्सलेटर हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश आणि फ्रेंचमध्ये पारंगत होते. तर एका वरीष्ठ ट्रान्सलेटरनी आम्हाला त्यांच्या हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाने नि:शब्द केले. प्रकाशकांनी त्यांच्या कामाचा मोबदला न दिल्याचे आणि त्यांचे 22 लाख रुपये अडकल्याचे ऐकून आम्हाला अतिशय वाईट वाटले.

आमच्या टिमच्या सहकाऱ्यांनी इतर स्टॉल्सना भेटी दिल्या आणि त्यामधून काही अपेक्षार्ह ऑफर्स देखील आणल्या. आम्ही आमच्या मुंबई कार्यालयात परतल्यावर हे व्यवहार पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करु.    

तुम्हाला सुध्दा मांगरोल मल्टिमीडिया: हॉल 12, स्टॉल 151मध्ये येण्याचे आम्ही आग्रहाचे निमंत्रण देत आहोत. 

एनबीटी डब्ल्यूबीएफ 2018: दिवस 04वर दृष्टिक्षेप  :

  •  वाढलेल्या वर्दळीमुळे वर्ल्ड बुक फेअर 2018च्या सर्व स्टॉल्ससाठी आज अतिशय चांगला दिवस होता.
  • आमच्याही स्टॉलवर अनेक लोक आहे. आम्हाला भाषांतर, लेखन, वेब डिझाइनिंगसाठी विचारणा करण्यात आली.
  • आमच्या स्टॉलवर आज एनबीटी अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली आणि आम्हाला आमच्या अनुभवाबद्दल विचारले गेले.
  •  नवी दिल्ली मधल्या वर्तमानपत्रांमध्ये ट्रान्सलेटर्सच्या आमंत्रणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून आम्ही अनेक प्रतिभावंतांच्या भेटीची आणि त्यांच्यासोबत कामाबद्दल चर्चा करण्याची अपेक्षा करीत आहोत.   
  • हॉल 12, स्टॉल 151मध्ये मांगरोल मल्टिमीडिया उपस्थित आहे आणि डब्ल्यूबीएफ 2018ला भेट देणाऱ्यांचे स्वागत करत आहे. आम्ही 40हून जास्त भाषांमध्ये लेखन आणि भाषांतरासोबत इंटरप्रिटेशन, ट्रांस्क्रिप्शन, ट्रान्स-क्रिएशन, ग्राफिक डिझाइनिंग, वेबसाइट सोल्युशन्स इ. अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देत आहोत.    

(संजय वि. शहा हे मांगरोल मल्टिमीडियाचे संस्थापक-सीइओ आहेत)

Comments